Home / अर्थ / आपले बजेट संकल्पनेला प्रतिसाद
mantralay_defult_thumb

आपले बजेट संकल्पनेला प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी)– राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा सन 2015-16 चा अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी आपले बजेट या संकल्पनेच्या माध्यमातुन देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, राज्य मंत्रीमंडळातील सहकारी, राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ, सामान्य नागरीक आदिंच्या सुचना मागविल्या. प्रामुख्याने ईमेल, व्हॉटस्अप, एस.एम.एस, वेबसाईट तसेच पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अर्थसंकल्पासाठी मोठया संख्येने सुचना प्राप्त झाल्या आहेत.

ईमेलच्या माध्यमातून 1226 , व्हॉटस्अपच्या माध्यमातून 1713, एसएमएसच्या माध्यमातून 720, वेबसाईटच्या माध्यमातून 313 सुचना प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त सुचनांमध्ये व्हॅट कर, सौरऊर्जा, राज्याच्या महसूली उत्पनात वाढ करणे, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, कौशल्यविकास, युवककल्याण, सांस्कृतिक क्षेत्र आदि. विषयांच्या अनुषंगाने सुचनांचा समावेश आहे. या सर्व प्राप्त सुचनांचा अभ्यास सुरु असून त्यातील काही सुचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. राज्यातील सर्वच भागातून या सुचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात असावे व अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा असेल असा विश्वास अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील तज्ञ व नागरिकांनी मौलिक सुचना दिल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले आहेत.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *