Home / Featured / एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांना अटक करा – नवाब मलिक
mantralay_defult_thumb

एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांना अटक करा – नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी)- राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित सहकाऱ्याच्या ३० कोटींच्या लाच प्रकरणात खडसे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांना अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी केली.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे कथित स्वीय सहाय्यक गजानन पाटील याला 30 कोटींची
लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय (एसीबी) ने दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. डॉ. रमेश जाधव यांनी याबाबत आठ महिन्यांपूर्वीच गजानन पाटील याच्या विरोधात एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये एकनाथ खडसे यांचे ओएसडी उन्मेश पाटील यांचेदेखील नाव नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात यावी असे ते म्हणाले.
महसूल विभागात अडकलेले जमनीचे प्रकरण मंजूर करण्यासंदर्भात डॉ. रमेश जाधव यांची महसूलमंत्री खडसे यांचे ओएसडी उन्मेश महाजन यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली होती. तेव्हा उन्मेश महाजन यांनीच डॉ. रमेश जाधव यांना गजानन पाटील यांची ओळख करुन दिली. त्यानंतर पाटील यांनी या प्रकरणासाठी जाधव याच्यांकडे 30 कोटींची मागणी केली. त्यानंतर बराचशा बैठका रामटेक बंगल्यावर तसेच मंत्रालयात झाल्या. या दरम्यान त्यांच्यात झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग एसीबीकडे आहे. शेवटी आठ महिने जाधव यांना दुर्लक्षित केले गेले. दोन दिवसांपूर्वी लोकायुक्तांनी या प्रकरणामध्ये सुनावणी घेतली व आदेश पारित केले. त्यानंतर या प्रकरणी गजानन पाटील याला अटक करण्यात आली. परंतू अद्याप यातील मुख्य सूत्रधार बाहेरच आहेत. ते मंत्र्यासाठीच कामे करतात हे आता सिद्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.
एसीबीने तत्काळ ओएसडी उन्मेश महाजन यांना अटक करावी, महसूल मंत्र्याच्या कार्यालयातील संगणकाच्या सर्व हार्ड डिस्क जप्त कराव्यात तसेच एसीबीकडे असलेल्या
रेकॉर्डिंगमध्ये ज्यांच्या-ज्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे, त्या सर्वांवर 123 बी अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *