Home / ताज्या बातम्या / चंद्रपूर किल्ल्याभोवती नवे अतिक्रमण होऊ देणार नाही- विनोद तावडे
mantralay_defult_thumb

चंद्रपूर किल्ल्याभोवती नवे अतिक्रमण होऊ देणार नाही- विनोद तावडे

मुंबई (प्रतिनिधी)- चंद्रपूर शहराच्या जुन्या भागाच्या चारही बाजूने गोंडराजाकालीन किल्ला आहे. ऐतिहासिक किल्ल्याच्या अवतीभोवती अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण जुन्या काळापासून झाले आहे. मात्र, आता चंद्रपूर किल्ल्याभोवती नवे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी महापालिकेकडून घेतली जात आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
शोभाताई फडणवीस यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर दिलेल्या उत्तरात तावडे यांनी सांगितले की, चंद्रपूर किल्ला हा राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (मंडळ कार्यालय, नागपूर) यांच्या अखत्यारीत येतो. या किल्ल्यापासून शंभर मीटर प्रतिबंधित क्षेत्रात आणि दोनशे मीटर विनियमीत क्षेत्रात बांधकाम झाल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येते. चंद्रपूर किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे. बिनबा गेटच्या जतन व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. पठानपुरा व अंचलेश्वर गेटच्या जतन व दुरुस्ती कामे प्रगतीपथावर आहेत. चंद्रपूर किल्ल्याच्या जतन आणि दुरुस्तीकरीता ४२ लाख रुपये खर्च करण्यात आहेत.
कोयना धरणग्रस्तांसाठी आय.टी.आय.चे प्रशिक्षण
महापारेषणच्या धोरणानुसार, कोयना धरणग्रस्तांपैकी ज्या प्रकल्पग्रस्तांनी किमान दहावी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असेल, त्यांना महापारेषण कंपनीच्या खर्चाने दोन वर्षांचे आय.टी.आय प्रशिक्षण दिले जाईल. ज्यावेळी सरळसेवा भरतीने रिक्त पदे भरण्याची कार्यवाही जाहिरात देऊन केली जाईल त्यावेळी त्यांनी रितसर अर्ज केल्यास त्यांना स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
कोयना धरणग्रस्तांचे कराडमधील मुंढे व विजयनगर येथे पुनर्वसन झाले असले तरी त्यांना त्यांचा पुरेसा मोबदला मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पग्रस्तांपैकी अनेक तरूण बेरोजगार आहेत. परिणामी त्यांना महापारेषणच्या नोकरी सामावून घेण्यात यावे, या मागणी आनंद पाटील यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकजण नोकरीसाठी पात्र नसल्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माणुसकीच्या नात्याने याप्रकरणी विचार करण्यात यावा आणि या प्रकरणाततरी तांत्रिक मुद्दे बाजूला ठेवा, असे निर्देश दिले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *