Home / ताज्या बातम्या / डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सशत्र पोलीस ठेवा- निंबाळकर
mantralay_defult_thumb

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सशत्र पोलीस ठेवा- निंबाळकर

मुंबई (प्रतिनिधी)- डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांत सशस्त्र पोलिसांच्या नेमणूका किंवा रुग्णालयाच्या आवारात पोलिस चौक्या स्थापन कराव्यात, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर रुग्णालयात रुग्ण दगावल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी नियम ९३ अन्वये सूचना मांडली होती. रुग्णालयात रुग्ण दगावल्यानंतर बहुतांशी वेळा ज्युनिअर डॉक्टरच नातेवाईकांच्या तावडीत सापडतात, अशा डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी २१० सुरक्षा रक्षकांची गरज असताना फक्त ११५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टरांबरोबरच अन्य रुग्णांच्याही सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आल्याचे यावेळी पावसकर म्हणाले.
यावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, डॉक्टरांवरील विशेषत: निवासी डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांसंदर्भात दर महिन्यास आढावा घेण्यात येतो. डॉक्टरांची संघटना असणाऱ्या मार्डशी चर्चा करुन काही संवेदनस्थळे ठरविण्यात आली आहेत. रुग्णालयातील आपत्कालीन विभाग, ऑपरेशन थिएटर, प्रसुती कक्ष, अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा पुरविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मुंबईत बॉऊंसर आणि सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. अन्य भागात सामान्य सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. तेव्हा सभापतींनी या चर्चेत हस्तक्षेप करून ग्रामीण भागातही जिल्हा रुग्णालयात असे प्रकार घडतात. त्यामुळे अशा ठिकाणी सशस्त्र पोलिसांची नेमणूक करता येईल का यादृष्टीने विचार करावा, असे निर्देश दिले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *