Home / ताज्या बातम्या / तीन मुख्याधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश
mantralay_defult_thumb

तीन मुख्याधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

मुंबई – जळगावच्या तत्कालीन नगरपालिकेमध्ये राबविल्या गेलेल्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीविषयी आ. उन्मेष पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरामध्ये उपस्थित केला. या प्रकरणी न्यायालयीन कार्यवाही सुरू असून 3 अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याबाबत आदेश दिले असल्याची माहिती लेखी उत्तराद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जळगाव नगरपरिषदेतील घरकुल घोटाळा, वाघूर पाणीपुरवठा प्रकल्प अनियमितता, अनियमित पदोन्नत्यांबाबत तत्कालीन 3 मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस यापूर्वीच बजावण्यात आल्याचेही उत्तरात सांगितले आहे.

आयुक्तांकडून चौकशीबाबतचा प्रस्ताव
आ. उन्मेष पाटील यांनी सदर चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला असून कोणती कारवाई केली आणि कारवाईस विलंब का झाला याबाबत प्रश्न उपस्थित केला. याला लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी कारवाईला विलंबाचा प्रश्न उदभवत नसल्याचे सांगत त अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याबाबत प्रस्ताव जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडून जून 2017 मध्ये प्राप्त झाला असून त्यानुसार विभागीय चौकशी आदेशीत करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *