Home / ताज्या बातम्या / नव्या वाहन धोरणात सुरूवातीला एका वाहनासाठीच वाहनतळ
mantralay_defult_thumb

नव्या वाहन धोरणात सुरूवातीला एका वाहनासाठीच वाहनतळ

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. अशा सगळ्याच वाहनांना पार्किंग उपलब्ध होण्यासाठी लवकरच नवीन वाहनतळ धोरण आणणार असून या धोरणात प्रत्येक घरासाठी सुरूवातीला एक वाहनासाठी वाहनतळाची सुविधा देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या वाहनाबाबत जागेच्या उपलब्धतेनुसार वाहनतळाची किंवा वाहन उभे करण्यासंबंधीची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
राज्यातील महापालिका क्षेत्रांत असलेल्या शहरांमधील समस्यांबाबत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना रणजित पाटील बोलत होते. राज्यातील असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत आहे. जे सांडपाणी उद्योगांकडून सोडले जाते, त्यातील मिथेनॉल गॅस काढून घेऊन त्याचा वापर पालिकेच्या बससाठी वापरता येऊ शकतो का, याबाबतचा विचार सरकार करत आहे. ग्रामीण भागातील नागरिक शिक्षणाच्या, आरोग्याच्या आणि इतर चांगल्या सोयी सुविधा शहरात मिळत असल्यामुळे शहरांकडे येण्याचा ओघ वाढत चालला आहे. ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा नागरिकांना द्यायला हव्या, त्याप्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका देऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत संबंधित संस्थांना एकत्रित आणून त्याची एक समिती स्थापन करण्याची गरज असून त्याबाबत सरकार विचार करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राज्यात सुरु आहे. या अभियानांतर्गत घनकचरा विलगीकरण, घनकचरा वाहतूक आणि घनकचऱ्यावरील प्रक्रियेबाबतची मार्गदर्शक सूचना पालिकांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या पालिका यासंदर्भात चांगले काम करीत आहेत. त्यांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. यावर्षी राज्यातील 50 शहरे आणि पुढील वर्षी 75 शहरे हागणदारीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगरोत्थानाबाबत राज्य सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेत असून जर्मन कंपनीकडून तंत्रज्ञानाबाबत मदत घेतली जाणार आहे. बायो मेडिकल वेस्टबाबत संबंधित पालिकांनी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडे पाहिले जाते. या जलवाहतुकीचे प्रकल्प 2020 पर्यंत पूर्ण केले जातील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मुझफ्फर हुसैन, दीप्ती चवधरी, डॉ. नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण, अनिल सोले, राहुल नार्वेकर, जोगेंद्र कवाडे, ॲड. निरंजन डावखरे, रामनाथ मोते, प्रकाश गजभिये यांनी चर्चेत भाग घेतला.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *