Home / ताज्या बातम्या / नीटसंदर्भात मिळालेल्या सवलतीमुळे २८१० विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचा मार्ग मोकळा
mantralay_defult_thumb

नीटसंदर्भात मिळालेल्या सवलतीमुळे २८१० विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी)- यंदाच्या वर्षी नीट रद्द करावी या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या आग्रही भूमिकेला आज केंद्रीय मंत्रिमडळाने पाठिंबा देत नीट रद्द करण्याच्या अध्यादेशाला मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 2810 जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 1720 व अभिमत विद्यापीठातील 1675 अशा एकूण 3395 जागा या मात्र नीटच्या मार्फत भरल्या जाणार आहेत. ज्या खासगी आणि अभिमत विदयापिठाचे प्रवेश यंदा नीटच्या मार्फत होणार आहे त्या विद्यार्थ्यासांठीही ऑनलाईन कोचिंग आणि वेबसाईटच्या माध्यामातून कोचिंग देण्याची सरकारची योजना सुरु राहणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या निर्णयामुळे नीटच्या जाचातून लाखो विद्यार्थी आणि पालकांना मुक्तता मिळाल्याचा आनंद झाला आहे. आजच्या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना होणार आहे. केंद्रीय अभ्यासक्रमाच्या अकरावी व बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर नीटची परिक्षा घेण्यात येते. सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात जास्त फरक नाही. परंतु सीबीएसईची परिक्षा पध्दती आणि राज्य शिक्षण मंडळाची परिक्षा पध्दत यामध्ये फरक आहे. त्यामुळे सीबीएसईच्या धर्तीवर होणारी नीट परिक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटते. त्यामुळे पुढील वर्षी होणारी नीट परिक्षा विद्यार्थ्यांना अवघड जाऊ नये यासाठी आपण उच्च माध्यमिक (एचएससी) बोर्डाच्या अध्यक्षांना दोघांचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पध्दतीत काय बदल करता येऊ शकेल याबाबत शिक्षणतज्ज्ञांची बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार बदल करण्यात येतील जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणाऱ्या नीट परिक्षेचा अभ्यास वेळेमध्ये करता येईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षी होणारी नीट परिक्षा ही एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादीत असून होमिओपॅथी, आयुर्वेदीक, युनानी आदी अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सीईटी मार्फत होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. नीट संदर्भात महाराष्ट्र सरकारचा शिक्षण मंत्री म्हणून आपण दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात व्यक्तीशः उपस्थित राहिलो. राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी ज्येष्ठ विधिज्ञांना राज्य सरकारची बाजू समजावून सांगितले तसेच या वेळी उपस्थित अन्य राज्यांच्या वकीलांशीही सविस्तर चर्चा केली असे ते म्हणाले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *