Home / Featured / नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर
Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोटबंदीनंतर आता राज्य सरकारकडून लोटाबंदी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी हागणदारीमुक्तीसाठी लोकांच्या हातातील लोटा जप्त करून त्याचा लिलाव करणार असल्याचे सांगितले. नोटाबंदीपेक्षा जनता आता लोटाबंदीला घाबरते असे सांगत आता लोटाबंदी राज्यभरात राबवून राज्याला स्वच्छ व समृद्ध बनवायचे असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील 13 जिल्हे सध्या हागणदारी मुक्त झाले असल्याचा दावा लोणीकर यांनी यावेळी केला. 2018 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना केले असल्याचे त्यांनी सांगितले. लोणीकर यांनी सांगितले की, देशात स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र 1 नंबरचे राज्य झाले आहे. शहरी भागात 8 लाख कुटुंबाला शौचालय दिले असल्याचे ते म्हणाले.

गेल्या 25 वर्षात जे काम झालं नाही ते या 2 वर्षात झाले आहे. शहरी भागात झोपडपट्टीमध्ये 56 लाख कुटुंबाला संडास बांधून देण्याचे काम बेस लाईन सर्व्हेमार्फत करण्यात आले असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. 2018 मार्च हे काम संपणार आहे, या कामाच्या प्रगतीचा आढावा अधिकाऱ्यांमार्फत घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यभरात शौचलयांसाठी 477 कोटी 66 लक्ष निधी केंद्राने दिला आहे. आम्ही 3 हजार 400 कोटी निधीची मागणी केली असून 400 कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळणार असल्याचे ते म्हणाले.

About admin

Check Also

mantralay_defult_thumb

५ ते १४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टी!

मुंबई : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात दि. 5 ते 14 ऑक्टोबर या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *