Home / अर्थ / प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे अशक्य
mantralay_defult_thumb

प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे अशक्य

मुंबई– राज्यातील ४०५ प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान ७० हजार कोटी रुपये लागतील. मात्र, त्याची व्यवस्था राज्याच्या अर्थसंकल्पातून होऊ शकणार नाही, अशी स्पष्ट कबुली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.
विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. या विधेयकाला उत्तर देताना ते बोलत होते. जे प्रकल्प ७५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहेत, त्यांनाच पूर्ण निधी देऊन प्रकल्प सुरु करण्यावर सरकारचा भर असून कालांतराने अन्य प्रकल्पांनाही जादा निधी देऊन ते पूर्ण करता येतील. त्यासाठी जादा पैसा उभा करावा लागेल व त्यासाठी सभागृहाच्या मान्यतेने मध्यप्रदेशसारख्या राज्यांनी राबवलेले नवे वित्तीय मार्ग वापरावे लागतील. त्यात कंत्राटदारांना प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही काळाने पैसे देण्याचा डिफर्ड पेमेंटसारखा मार्ग अथवा प्रोजेक्ट फायनान्स मार्गाने निधीची उभारणी करणे आदी मार्ग वापरले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
चौदाव्या वित्त आयोगाने केंद्रीय निधीतील राज्यांचा वाटा ३२ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर आणला असला तरी त्यातून आपल्याकडे ११ हजार कोटी रुपये अधिकचा निधी येईल असे म्हणता येणार नाही. कारण ही टक्केवारी वाढवून देताना केंद्र सरकारने ११-१२ योजनांना निधी देणे बंद केले आहे. तो वजावटीचा फरक विचारात घ्यावा लागेल. पण पूर्वीच्या मानाने राज्याला जादा निधी केंद्राकडून मिळेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *