Home / भुमिका
mantralay_defult_thumb

भुमिका

आपल्या राज्याचा कारभार नेमका चालतो कसा? याची उत्सुकता सर्वांनाच असते. मात्र महाराष्ट्र सरकार जेथून चालते त्या मंत्रालयाविषयी आपल्याला अत्यंत तोकडी माहिती असते. यात विविध शासकीय निर्णय, मंत्रीमंडळाचे निर्णय/ अध्यादेश हे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असतात. मात्र पारंपरिक प्रसारमाध्यमांमध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडींशिवाय मंत्रलायास फारसे स्थान नसते. नेमकी हीच बाब लक्षात घेत आम्ही ‘मंत्रालय लाईव्ह’ हे पोर्टल आपल्यासमोर सादर करत आहोत.

या पोर्टलमध्ये दैनंदिन घडामोडींना तर स्थान राहणारच आहे पण यासोबत मीडियात क्वचित झळकणार्‍या विषयांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. एका अर्थाने प्रशासन आणि जनता यांच्यातील अत्याधुनिक आणि कुठेही सुलभरित्या उपलब्ध होणारा दुवा बनण्याचा आमचा मानस आहे. या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध लोकल्याणकारी योजना आणि ध्येयधोरणांना जनतेसमोर सादर केले जाणार आहे. आज इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असून अगदी वाडी-वस्त्यांवरही हे माध्यम पोहचले आहे. याचा उपयोग करून पारदर्शकतेने राज्य शासनाची कामगिरी पोहचवणे हाच आमचा प्रमुख हेतू आहे.

अर्थात हा संवाद फक्त एकतर्फी नसेल. सर्वसामान्यांना मंत्रालयातील घडामोडींची माहिती देत असतांना जनतेच्या समस्या तसेच व्यथा-वेदना थेट उच्च पातळीवर पोहचवण्यासाठीदेखील आम्ही कार्यरत राहू. राज्यातील शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील समस्यादेखील मांडण्यासाठी ‘मंत्रालय लाईव्ह’चा उपयोग होईल यात शंकाच नाही. एका अर्थाने जनता आणि प्रशासनात सुसंवाद साधण्याचे आमचे एकमेव ध्येय आहे. यात आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही अपेक्षा.

5 comments

 1. आपल्या मंत्रालय लाईव्ह या वेब पोर्टलमध्ये कामाची संधी मिळेल का?.

  आपल्या मंत्रालय लाईव्ह या वेब पोर्टलच्या माध्यामातून मंत्रालयातील इत्तभूत घडामोडींची माहिती मिळते……त्यामुळे निश्चितच हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

 2. गजानन रविन्द्र कदमबाडे

  अतिशय सुदर उपक्रम व आतिशय म्हातावाचा योजना आहे की या side द्वारे जनतेला शाशन चा माहिती नविन योजना माहित होता आहे
  या web side ला खुप खुप शुभेचा

 3. या वेबसाइटमळे लोकांना मंत्रालयातील ताजे अपडेट्ल लगेच समजतात

 4. या वेबसाइटमळे लोकांना मंत्रालयातील ताजे अपडेट्ल लगेच समजतात

 5. या वेबसाइटमळे लोकांना मंत्रालयातील ताजे अपडेट्ल लगेच समजतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *