Home / ताज्या बातम्या / राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार
mantralay_defult_thumb

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबई (प्रतिनिधी)- नीट परीक्षेच्या सक्तीबद्दल आपण केलेल्या आवाहनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्राची “नीट” (National Eligibility-cum-Entrance Test) द्यायची की राज्य सरकारची CET (Common Entrance Test) द्यायची हा विषय महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू होता. त्यातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. ह्या विषयासाठीच मला जेव्हा पालक भेटले तेंव्हा मी स्वत: पंतप्रधानाशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो. हा महाराष्ट्रातील चार लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न असून हे सर्व विद्यार्थी प्रचंड ताणात असल्याचे मी त्यांच्या कानावर घातले आणि ह्या वर्षीच्या “नीट” परीक्षेचे बंधन रद्द करावे अशी मागणी केली.

मला आनंद वाटतो की माझ्या ह्या आवाहनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ह्या वर्षीच्या “नीट” परीक्षेचे बंधन रद्द केले आहे. मी ह्याबद्दल त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे आभार मानतो. ह्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे चार लाख विद्यार्थी एका विलक्षण ताणातून मुक्त झाले आहेत. मी त्या सर्वांना त्यांच्या भावी जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटले आहे.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *