Home / Featured / विरोधी पक्ष नेत्यांना शिक्षणातील काही कळत का?

विरोधी पक्ष नेत्यांना शिक्षणातील काही कळत का?

मुंबई (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या अध्यादेशामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे साडे तीन हजार जागांना राज्यातील सीईटीचे विद्यार्थी मुकणार हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेला दावा म्हणजे त्यांना नक्की शिक्षणातील काही कळत का, अशी शंका उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

खाजगी व अभिमत विद्यापीठांसाठी यापूर्वीही त्यांच्या स्वतंत्र परिक्षा व्हायच्या या परिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांकडून कोट्यावधी रुपयांची लूट होत असते. या लूटीच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी राज्य सरकारने कायदा पारित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार होणारी नीट परीक्षा खाजगी व अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी होणारा भ्रष्टाचार रोखू शकते. त्यामुळे बहुधा धनंजय मुंडे नाराज झाले असावेत. केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे लाखो गरीब आणि ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचे हित कायम राहिल्यामुळे या निर्णयाचे कौतुक करण्याऐवजी विरोधी पक्षनेते खाजगी वैद्यकीय महाविद्यालय संस्थाचालकांची बाजू घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *