Home / ताज्या बातम्या / सत्ताधारी आमदार असल्याची लाज वाटते
mantralay_defult_thumb

सत्ताधारी आमदार असल्याची लाज वाटते

मुंबई (प्रतिनिधी)- मंत्रालयासमोर आत्महत्या केलेले नांदेड मधिल शेतकरी माधव कदम यांच्यांवरुन विधानसभेत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी सत्ताधारी आमदार असल्याची लाज वाटते अशा शब्दात आपला संताप आणि हतबलता व्यक्त केली.महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कदम यांना 4 हजारांची मदत करण्यात आल्याचे सांगताच उसळून उठत हेमंत पाटील यांनी आजच्या काळात 4 हजारांची तुटपुंजी मदत पुरते का असा संताप व्यक्त केला.

नांदेड मधिल शेतकरी माधव कदम यांच्या मंत्रालयासमोरील आत्महत्या प्रकरणाचे जोरदार पडसाद आजच्या विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील , जयंत पाटील अजित पवार , गणपतराव देशमुख यांनी यावरुन राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार तोंडसुख घेतले. मात्र नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी आपली खंत व्यक्त करतांना सत्ताधारी आमदार असल्याची लाज वाटते असे सांगून त्यांच्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. ते म्हणाले की माधव कदम हे माझ्या मतदारसंघातील होते. माझे जवळचे मित्र होते. मदतीसाठी त्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांकडे विनंती अर्ज केले होते. खेटा मारल्या होत्या मात्र तरीही त्यांना काहीच मिळू न शकल्याने अखेरीस त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला असे सांगत अध्यक्ष महाराज मला लाज वाटते मी सत्ताधारी आमदार आहे हे सांगण्याची अशी अत्यंत भावविवश हतबलता हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. सरकार त्यांना चार हजारांची मदत दिल्याचे सांगत आहे त्यावर जोरदार भडीमार करतांना 4 हजार रुपड्यांची तुटपुंजी मदत कोणाला तरी पुरते का असा संतप्त सवालही त्यांनी केला. शेतकरी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मंत्रालयासमोर येऊन आत्महत्या करु लागला आहे आता तरी सरकार त्याची दखल घेणार का असा सवालही हेमंत पाटील यांनी केला. अजित पवार यांनीही याप्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले अध्यक्ष एवढ्या संवेदनशील विषयावर गणपतराव देशमुखांसारख्या ज्येष्ठ सदस्याला बोलू देत नाहीत हे योग्य नव्हे त्यावरुन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना अध्यक्षांवर आरोप करु नका असे सांगितले. सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर आहे असे सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला मात्र विरोधकांनी सरकारचा धिक्कार करत सभात्याग केला.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *