Home / ताज्या बातम्या / सायबर कायदा मजबूत नसल्याने खूप सोसलंय!
mantralay_defult_thumb

सायबर कायदा मजबूत नसल्याने खूप सोसलंय!

मुंबई- राज्यामध्ये सायबर कायदा कमजोर असून यामुळे मला वैयक्तिक प्रचंड त्रास झाला आहे. महिला आमदारांना अश्लील मेसेजेस येतात. जर आमच्यासारखे सदस्य सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. खडसे यांच्या या भूमिकेमुळे विरोधक देखील त्यांच्या मदतीला आल्याने सरकारची चांगलीच गोची झाली. विधानसभेत राज्यातील सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा प्रकल्पाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावरून खडसे यांच्यासह सदस्यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना कात्रीत पकडले.

कमजोर कायद्यामुळे आरोपी मोकाट
विधानसभेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सायबर गुन्ह्यांवर प्रश्न विचारला. या चर्चेत सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले. राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत विरोधक व सत्ताधारी असे सगळेच अक्रमक झाले. याचर्चेत सत्ताधारी भाजप आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अक्रमकपणे सहभाग घेतला. खडसे म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यात सगळ्यात जास्त मला भोगावं लागलयं, त्या मनीष भंगाळेमुळे माझी अख्ख्या देशात बदनामी झाली. आपल्या कुमकवत सायबर कायद्यांमुळे आरोपी पकडला असूनही तो मोकळा सुटला आहे, त्यामुळे कठोर कायदे करा.’ असे सांगत खडसे यांनी गृहमंत्री रणजीत पाटील यांना धारेवर धरले.

रणजित पाटलांची उडाली भांबेरी
खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रणजीत पाटील यांची भंबेरी उडाली. पाटील यांनी पोलीसांना या कायद्याचे शिक्षण ट्रेनिंगमध्ये देण्यात येते. राज्यात 47 सायबर लॅबची स्थापना करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये सायबर ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून 118 लोकांचे ट्रेनिंग पूर्ण झाले असून आता त्यांची मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी सदस्यांनी कितीजणांना राज्याच्या सायबर कायद्याने शिक्षा झाली ते सांगण्याचा आग्रह पाटील यांच्याकडे धरला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विक्षेपाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी मंत्री गोल-गोल उत्तरे देत असून हा प्रश्न राखून ठेवण्याची विनंती अध्यक्षांना केली. मात्र अध्यक्षांनी ही सूचना अमान्य केली.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *