Home / अन्न-नागरी पुरवठा / हल्दीरामचे नमुने गझियाबाद प्रयोगशाळेत पाठवा
mantralay_defult_thumb

हल्दीरामचे नमुने गझियाबाद प्रयोगशाळेत पाठवा

मुंबई (प्रतिनिधी)- नागपूर शहरात उत्पादीत होणाऱ्या हल्दीराम यांच्या मिठाई तसेच नमकीनच्या पदार्थांमधील कथित भेसळीच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी या पदार्थांचे पुन्हा नमुने घेऊन गझियाबाद प्रयोगशाळेत पाठवण्यात यावे असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी राज्य सरकारला दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बाजोरिया यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री बापट म्हणाले की, हल्दीराम यांच्याकडून ४१ नमुने घेतले होते. त्यातील ४६ नमुने प्रमाणित निघाले व तीन कमी दर्जाचे आणि दोन असुरिक्षत होते. त्यातील एका नमुन्याला २७ हजार रुपये दंड केला असून दोन नमुन्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
हल्दीरामच्या उत्पादीत पदार्थाचे अनेक ठिकाणचे नमुने घेण्यात आले आाहेत असे सांगत असतानाच बाजोरिया म्हणाले की, अमेरिकेत हल्दीरामच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर किटकनाशके तसेच सालमोनीला हा विषाणू आाढळल्याने अमेरिकेनेही हल्दीरामच्या उत्पादनावर बंदी घातली असताना अधिकारी चुकीची माहिती देत आाहेत. त्यामुळे हक्कभंग आणला पाहिजे असे ते म्हणाले.
त्यावर मंत्री बापट म्हणाले की, कोणालाही पाठीशी घालण्याचा उद्देश नाही. आपल्या अन्न व औषध प्रशासन कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असून या संदर्भात आापण केंद्रीय मंत्र्यांनादेखील भेटलो आहोत. अशा प्रकरणी एखाद्याला शिक्षा झाल्याशिवाय ते वटणीवर येणार नाही असे सांगत हल्दीरामच्या उत्पादनाचे नमुने सभापतींच्या निर्देशानुसार गाझियाबादला पाठवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *